गावाविषयी माहिती
खडक माळेगाव हे गाव खडकावर वसलेले असल्याने या गावाला खडक माळेगाव असे नाव पडले आहे. खडक माळेगाव हे एक धार्मिक गाव असून येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
गावाचे नाव – खडक माळेगाव, ता. निफाड, जि. नाशिक
ग्रामपंचायत स्थापना तारीख – ०९/०६/१९५६२०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ५९०१ आहे.
यामध्ये पुरुष – २८३६, स्त्रिया – २६०९, अनुसूचित जाती (SC) – ४८१, अनुसूचित जमाती (ST) – ८१४ आणि इतर – ४६०६ इतकी लोकसंख्या आहे.गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १९६२.१७ हेक्टर आहे.
यामध्ये बागायत जमीन १४५४ हेक्टर, गायरान १.०० हेक्टर असून गावठाण व वनक्षेत्राची माहिती उपलब्ध नाही.गावामध्ये एकूण १२०६ कुटुंबे राहतात.
यापैकी २४४ कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील आहेत. ग्रामपंचायतीत एकूण १४ सदस्य कार्यरत आहेत.कर व मिळकत तपशिलानुसार –
एकूण मिळकत धारक – १४७४, गाळा / जागा भाडे धारक संख्या – ८६ असून एकूण डिमांड ₹१,६१६०० आहे.पाणीपुरवठा स्रोत –
गावात पाण्याची टाकी असून तिचा कोड ०१ आहे व ती संपूर्ण लोकसंख्या ५९०१ साठी आहे. तसेच सार्वजनिक विहिरीतूनही पाणीपुरवठा केला जातो. यासाठी अंदाजित खर्च ₹१,९०,०००/- असून ५१८ घरगुती जोडण्या आणि ९६० सार्वजनिक जोडण्या उपलब्ध आहेत.दिवाबत्ती –
गावात एकूण १५६ पथदीप व ६ हायमस्ट कार्यरत आहेत.